Type Here to Get Search Results !

बोरगाव | श्रीनाथ व बाबासाहेब पाटील कनिष्ठ महाविद्यालयात तब्बल 26 वर्षा नंतर माजी विद्यार्थीचा स्नेंह मेळावा संपन्न



माजी विद्यार्थी स्नेंह मेळावा बोरगांव येथील श्रीनाथ व बाबासाहेब पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आनंदीमय वातावरणात साजरा:भिमराव भुसनर पाटील


 1996-97 मधील 10 वी च्या विद्यार्थ्यांचा तब्बल 26 वर्षा नंतर पालक - विद्यार्थी कृतज्ञता सोहळा श्री नाथ विद्यालय व विजयकुमार ऊर्फ बाबासाहेब पाटील कनिष्ठ महाविद्यालय बोरगांव येथे दि.28/5/2023 रोजी सकाळी 10:00 वा. आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास येणारे शिक्षक व मान्यवरांचे स्वागत व औक्षण हलगीच्या कडकडाट आवाजात करून मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे प्रदेश कोअर कमिटीचे नेते स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा.राजकुमार पाटील शालेय व्यवस्थापन अध्यक्षा मा.सौ.कुमूदिनी पाटील व माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष पृथ्वी पाटील व प्रा.कांबळे सर आणि सुधीर कपडेकर सह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमांची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील,स्व.लक्ष्मी पाटील स्व.शंकरराव पाटील, स्व.बाबासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमास सुरूवात झाली.यावेळी व्यासपीठावर मा.रणदिवे सर मा.चव्हाण सर मा.इंगळे सर मा.होळीकर सर मा.चौगुले सर, मा.यादव सर मा.लिंगे सर मा.भोसले सर मा.बागल सर, मा.मा.एंभतनाळ सर,मा.घुले सर,मा.शिरकांडे सर मा.कोरे सर, मा.गाडे सर उपस्थित होते.

या सर्व मान्यवरांचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.सुशिल पाटील मा.महारूद्र कोळी सर,मा.डाॅ. दिपाली पाटील,मा.ज्योती लोंढे मा.विकास पाटील मा.ॲड.प्रणव कुलकर्णी 

मा.अमोल पाटोळे,मा.सदानंद खटके,मा.विश्वजित देशमुख यांनी प्रयत्न केले.

यावेळी मा.रणदिवे सर मा.होळीकर सर मा.डाॅ राहुल शिरकांडे. मा.डाॅ.दिपाली पाटील मा.भिमराव भुसनर यांनी जुन्या आठवणींना उजाळा करून दिला.

तर कार्यक्रमास भारत शेळके, विजयकुमार गुंड,सुनिल पवार, अनिल सावंत,डाॅ.अतुल कांबळे, राजेंद्र साठे, सुजाता माने पाटील, गितांजली चव्हाण,नलिनी भगत, संदीप सुतार, संतोष केचे, विजय बेलदर,संजय सुरवसे चेअरमन, संजय चंदनशिवे,आनंदा माने, सचिन भगत,संतोष नगरे डाॅ. निलेश स्वामी,अजय घळके, संजय भोसले अर्जुन इंगोले सिंकदर दिलावर,प्रशांत पवार या सर्वांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डाॅक्टर दिपाली पाटील तर आभार प्रदर्शन मा.ज्योती लोंढे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad