U23 राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये बीड ग्रामीण संघ विजेता
( दुतिय क्रमांक रत्नागिरी जिल्हा तृतीय क्रमांक जालना )
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली U23 वर्षा आतिल टेनिस क्रिकेट महाराष्ट्र चॅम्पियनशीप स्पर्धा सय्यद पिंपरी क्रीडा संकुलन येथे उत्साहात संपन्न झाली
त्यामध्ये प्रथम क्रमांक बिड ग्रामीण दुतिय क्रमांक रत्नागिरी जिल्हा तृतीय क्रमांक जालना संघ यांना मिळाल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी ,अप्पर विभागीय आयुक्त नाशिक श्री काटकर साहेब ,जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील,, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट महिला डायरेक्टर धनश्री गिरी, महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोमरे , विलास गिरी,संदिप पाटिल व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड व जिल्हा सचिव, संघ व्यवस्थापक ,क्रीडा शिक्षक व खेळाडू व महाराष्ट्र पंच इत्यादी उपस्थित होते राज्य टेनिस क्रिकेट सचिव मिनाक्षी गिरी यांनी खेळाडूंना टेनिस क्रिकेट खेळाची माहिती व नियम सांगितले.
पहिली 23 वर्षा आतिल राज्य स्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप नाशिक मधील सय्यद पिंपरी क्रीडा संकुलन येथे संपन्न झाली या स्पर्धेसाठी राज्यातून मुलांचे 16 संघ व मुलींचे आठ संघानी सहभाग नोंदवला या स्पर्धेचा अंतिम सामना रत्नागिरी विरुद्ध बिड जिल्हा यांच्या झाला अंतिम फेरीत रत्नागिरी असलेल्या संघाशी लढत झाली यात सुरुवातीला खेळताना रत्नागिरी संघाने 6 षटकात 54/5 धावा केल्या बीड ग्रामीण ने 31बॉलवर तीन धावांची गरज असताना फुल टच बॉलवर चौकार मारून बीड ग्रामीण संघाने विजयश्री मिळवला. जिल्हा रत्नागिरी संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला.
तसेच जालना संघाला तिसरा क्रमांक मिळाला तसेच मुलीच्या संघामध्ये अंतिम सामना धाराशिव विरुद्ध जालना होऊन धाराशिव नी उत्कृष्ट खेळल करत संघाला विजयश्री मिळवून दिला तर उपविजयी जालना ला मिळाल्याबद्दल बद्दल व संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट founder फाउंडर कन्हैया गुज्जर, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी, विलास गिरी ,स्वप्निल ठोंबरे,धनु लोखंडे ,नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. विजयी संघाचे मान्यवरच्या पाहुण्यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
पंच म्हणून धनंजय लोखंडे ,संदिप पाटिल ,शोएब अली ,विजय उंबरे, श्रीकृष्ण देशमुख,पंकज सर्वे , गोपाल फुरंगे ,मानस पाटिल ,सिध्देश गुरव ,दर्शन थोरान ,ओमकार पवार , सुमित अणेराव, कुणाल हदळकर यांनी पंच काम बघितले.