जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांबाबत मोठा दावा
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटातले उरलेले 13 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा केला. त्या दाव्यावर राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. 'संपर्कात सगळेच एकमेकांशी असतात, तसे एकनाथ शिंदे हे माझ्या संपर्कात आहेत. त्यामुळेच उदय सामंत म्हणतात, ते काही खोटं नाही', असे पाटील म्हणाले. तसेच जयंत पाटलांनी खासदार अमोल कोल्हेंच्या विधानालाही पुर्ण विराम दिला आहे.