शेटफळचा संस्कार वागज ब्लॅक बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण
24 ते 27 एप्रिल रोजी सांगोला येथे शितो रिओ कराटे- डो असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या झालेल्या ब्लॅक बेल्ट परीक्षेत कु.संस्कार सिद्धेश्वर वागज हा उत्तीर्ण झाला , मागील दोन वर्षापासून संस्कार आरोही स्पोर्ट क्लब शेटफळ येथे कराटेचे प्रशिक्षण घेत आहे संस्कार हा १० वर्षाचा असून सलग 4 दिवस सुरू असलेल्या परीक्षेत त्याने त्याचे कौशल्य दाखवले. एवढ्या कमी वयात हे यश मिळवणारा संस्कार हा जिल्ह्यातील पहिला खेळाडू आहे त्याच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून त्याचे कौतुक होत आहे.
त्याला मार्गदर्शन श्रीकांत पुजारी सर यांचे लाभले व या स्पर्धेच्या वेळी रामचंद्र करणवर सर, शुभम पूरवत सर, ओंकार वागज सर गणेश काशीद सर हे उपस्थित होते, त्याचे अभिनंदन मा श्री विजयराज दादा डोंगरे सभापती अर्थ व बांधकाम जिल्हा परिषद सोलापूर यांनी केले.