नव्या नवरी चा पैशा साठी सासरच्यांकडून छळ
मंचर | आंबेगाव येथील पूर्वा यांचे दि.13/12/2021 रोजी सुशांत अनिल सोनवणे रा. मेनोले पार्क, पाईपलाईन रोड, गंगापूर रोड,नाशिक जिल्हा नाशिक याच्याशी विवाह झाला ,विवाह झाल्या नंतर दोन महिन्यातच पूर्वा सुशांत सोनवणे हीचा तिच्या सासरकडचे लोक म्हणजेच तिचा पती सुशांत अनिल सोनवणे वय वर्षे 32, सासु पूजा अनिल सोनवणे वय वर्षे 50, सासरे अनिल माधवराव सोनवणे वय वर्षे 57, दिर अमेय अनिल सोनवणे या सर्वांनी संगनमत करून घरातील प्रापंचिक कारणावरून शिवीगाळ , दमदाटी करून वारंवार हाताने मारहाण करून तसेच वेळोवेळी माहेरहुन पैसे आणण्यास सांगुन ते न दिल्याचा राग मनात धरून पूर्वा हीचा मानसिक व शारीरिक छळ केलेला आहे त्या विरोधात पूर्वा हिने मंचर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत या सर्वान विरोधात तक्रार दाखल केली आहे व या नुसार मंचर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.166/2023 भा.द.वि.क 4988 (अ), 323,504,506,34 या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवलदार हिले हे करीत आहेत .
प्रतिनिधी - आकाश भालेराव
मंचर