कैलास संतोष भामरे यांना साहित्य भुषण सन्मान पुरस्कार प्राप्त
वाखारी प्रतिनधी दादाजी हिरे
वाखारी ता देवळा येथील भुमीपुत्र कैलास संतोष भामरे यांनी साहित्य क्षेत्रात समाजातील मनाला खटकणाऱ्या अनेक गोष्टीवर आपल्या प्रभावी लेखणीने अहिरानी, मराठी भाषेत काव्य लिखान करुन उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन त्यांना खुप सारे पुरस्कार मिळालेत. पैकी बहिणाबाई चौधरी साहित्य पुरस्कार, अहिरबोली पुरस्कार, राष्ट्रीय खांदेश साहित्य गौरव पुरस्कार, महाकवी कालिदास साहित्य सन्मान पुरस्कार.आताच रविवार दिनांक १६ /४ /२०२३ रोजी मानवता बहुउद्देशीय संस्था धुळे महाराष्ट्र राज्य यांच्याकडून वेगवेगळे साहित्य निर्मिती केल्याने खांदेश साहित्य अकादमी पुरस्कृत श्री कृष्णा पाटील यांच्या हस्ते त्यांना "साहित्य भुषण" हा पुरस्कार, शाल श्रीफळ सन्मानपत्र गुलाब पुष्प व शिल देवून गौरविण्यात आले. हा कार्यक्रम अमळनेर तालुक्यातील दहिवद या गावी कवीसंमेलनासह संपन्न झाला. या त्यांच्या कार्याचा अभिमान ठेवून वाखारी गावातील गावकरी, आप्तस्वकीय व मित्रपरिवार यांनी त्याचे कौतुक व अभिनंदन केले.