कत्तलीसाठी साठी घेऊन जात असलेल्या वारसाला जीवदान
दि.17/04/2023 सकाळी 9 वाजताच्या सुमारास मौजे पेठ गावच्या हद्दीत हॉटेल जय भवानी पुणे नाशिक हायवे लगत ता. आंबेगाव जि. पुणे या ठिकाणी योगेश भोसले रा. आवटे कॉलेज शेजारी मंचर, ता.आंबेगाव जि.पुणे हा मोटासायकल नं. MH12KR0023 या गाडी वर जनावर वाहतुकीचा परवाना नसताना व त्यामध्ये हे वासरू कत्तलिसाठी घेऊन जात असताना तसेच त्याच्या कडे जनावराची वैद्यकीय तपासणी नसताना बेकायदेशीर रित्या वाहतूक करत असताना गणेश दत्तात्रय येळवंडे पोलीस शिपाई मंचर पोलीस स्टेशन यांना मिळून आलेला आहे त्या मुळे योगेश भोसले यांच्या वर मंचर पोलीस स्टेशन येथे मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 177,83, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1) (अ),(ड),(आय), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5 , (अ),(ब) 9, भा.द.वि.क 34 प्रमाणे नोंद करून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवलदार जांभळे हे करीत आहेत .
प्रतिनिधी - आकाश भालेराव
मंचर