"प्रसिद्धी मिळवण्यासाठी अहमद बंधूंची हत्या"
कुख्यात गुंड अतीक अहमद, आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी उत्तर प्रदेशात पोलिसांसमक्ष गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. लवलेश तिवारी, सनी, अरुण मौर्य अशी गोळी झाडणाऱ्या आरोपींची पोलिसांनी ओळख पटवली आहे. प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतूने आम्ही अतीक आणि अहमद यांना गोळ्या घातल्या. त्यामुळेच आम्ही पत्रकाराच्या वेशात पूर्व नियोजित योजना आखून त्या ठिकाणी दाखल झालो होती, अशी कबुली मारेकऱ्यांनी दिली