मंचर येथे इको गाडी आणि मोटारसायकल मध्ये अपघात
दी. 16/04/2023 रोजी दुपारी 3:45 वां सुमारास समाधान हॉटेल समोर इको गाडी नं. MH12GZ5408 वरील चालक कपिल दीपक पाटील रा. मिरगणहळी ता. निलंगा जि.लातूर याने भरधाव वेगाने निष्काळजीपणे गाडी चालून समोर जाणारी मोटारसायकल सी.डी डीलक्स गाडी नं.MH14JW7237 व पल्सर नं. MH12MP0523 या दोन्ही मोटरसायकलींना रोडच्या विरुध्द बाजूने येऊन धडक दिली या अपघातात मोटारसायकल वरील 1) नवनाथ रोहिदास मोजाड वय 35 वर्ष, 2) सौ.माधुरी नवनाथ मोजाड वय 32 वर्ष दोन्ही राहणार सीतेवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे , 3) वीनायक बाळासाहेब मोरडे वय 23 वर्ष राहणार मोरडेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांना मार लागला असून त्यांच्या वर पुढील उपचार सुरू असून इको चालक कपिल दीपक पाटील याच्या वर अपघात केल्या प्रकरणी मंचर पोलीस स्टेशन येथे, पोस्ट गु.र .नं 145/2023 भा द वी कलम 279,337,338,427, मो.वा.का क 184,4/122/177 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे, व पुढील तपास पोलीस हवलदार गणपत डावखर हे करत आहेत.
प्रतिनिधी - आकाश भालेराव
मंचर