खासदार राजेंद्र गावित यांच्या माध्यमातून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील प्रलंबित अनुकंप भरतीचा प्रश्न सुटला.
जव्हार प्रतिनिधी :- सुनिल जाबर
पालघर जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील प्रलंबित अनुकंप भरती बाबत खासदार आपल्या दारी या अजंता ॲग्रो मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्यात जव्हार तालुक्यात डबकपाडा येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या वेळी संबंधित नागरिकांनी निवेदन सादर केले होते. या निवेदनाचा अजंता ॲग्रो मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष अजित घोसाळकर व विभागीय अध्यक्ष यशवंत देशमुख व त्याच्या टीम ने याबाबत सतत पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून संबंधित प्रलंबित प्रश्नां बाबत पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी याबाबत जिल्हा अधिकारी यांना पत्र देऊन सदर प्रश्न मार्गी लावून संबंधित गरीब जनतेला न्याय मिळवून द्यावे अशी सूचना दिली असून महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक अकंपा - १२१९/ प्र.क.५६/८ मार्गदर्शन अनुक्रमांक पाच थोडक्यात पद भरती निर्णयामुळे अन्य प्रशासकीय कारणामुळे सरळ सेवेची भरती होऊ शकली नाही. तरी प्रतिवर्षी संबंधित वर्षीच्या रिक्त पदांच्या २० टक्के पदे अनुकंप नियुक्तीने भरण्याची कार्यवाही करणे बंधनकारक आहे.
तसेच जर मागील काही वर्षात अनुकंप नियुक्तीची कार्यवाही करण्यात आली नसल्यास त्या त्या वर्षी सरळसेवा कोट्यात जेवढी रिक्त पदे झाली होती त्या पदांच्या २० टक्के पदे आणि चालू वर्षीच्या सरळ सेवा कोट्यातील रिक्त होणाऱ्या पदांच्या २० टक्के पदे अनुकंपा नियुक्तीने भरावित. वर नमूद केलेल्या शासन निर्णयानुसार पालघर जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात २० टक्के अनुकंप भरती होणे आवश्यक असताना गेल्या अनेक वर्षापासून अनुकंप भरती झाली नाही त्यामुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी घटकांवर हा अन्याय झाला आहे आपण आदिवासी जनतेच्या हितासाठी नेहमीच आवाज उठवत असतात व त्यांचे प्रश्न खासदार राजेंद्र गावित यांच्या माध्यमातून सुटला आहे.