महिलेची फसवणूक २९ जणांवर गुन्हा दाखल
अस्सा कंपनीच्या नावावर फिर्यादीस ५ लाखाप्रमाणे एक एक गुंठा जमीन खरेदी करण्यास भाग पाडून ठरल्याप्रमाणे फिर्यादीने तो व्यवहार पूर्ण करूनही फिर्यादीस मोबदला न देता १० लाख रुपयांची फसवणूक केल्याने फिर्यादी सरोज माने (वय ४५) यांनी फिर्यादीत नमूद केलेल्या रकमेची मागणी आरोपींकडे केली असता आरोपीने रक्कम परत न दिल्यामुळे फिर्यादीने न्यायालय गाठले. या प्रकरणी संशयित आरोपी प्रशांत झाडे याच्यासह २९ जणावर माढा न्यायालयाच्या आदेशानुसार कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादीने कुर्डुवाडी पोलीसठाण्यामध्ये तसेच पोलीस अधीक्षक सोलापूर यांच्याकडे तक्रार केली होती.