वाखारी येथे भुरट्या चोरांनी केले डांळीब लंपास
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
वाखारी ता देवळा येथील शेतकरी सध्या असमानी व सुलतानी संकटांना सामोरी जात असताना आता भुरट्या चोरांनी थैमान सुरुवात केली असून वाखारी येथील भिलदर वस्ती येथील गट नं 13 57 मधली शेतकरी दादाजी निंबा चव्हाण यांच्या शेतातून बागेतील उत्तम दर्जाची 20 ते 25 कॅरेट डाळींब अज्ञात चोरांनी मंगळवारी १८ - ४ - 2023 रोजा मध्य रात्रीच्या वेळेस पळवली.
कष्टाने पिकवलेला डाळींब चोरीला गेल्याने चव्हाण यांना मोठा फटका बसला आहे डाळींब बागेतील होत असनारी वाढत्या चोरीमुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले.