Type Here to Get Search Results !

आज उत्तर प्रदेशात गँगस्टर अतिक अहमदची हत्या झाली त्यावर त्याच्या मागचा गँग्स ऑफ वासेपूर टाईप इतिहास माहिती नसेल तर पहा:



आज उत्तर प्रदेशात गँगस्टर अतिक अहमदची हत्या झाली त्यावर त्याच्या मागचा गँग्स ऑफ वासेपूर टाईप इतिहास माहिती नसेल तर:


०. अतिक अहमद एक प्रस्थापित गँगस्टर होता, त्याचे सर्व कुटुंब म्हणजे भाऊ, पत्नी, मुले सगळे गुन्हेगारीमध्ये गुंतलेले होते. त्याने १९८९ मध्ये राजकारणात प्रवेश केला.तो अलाहाबाद(प्रयागराज) पश्चिम विधानसभा चा आमदार निवडून आला. मग पुढे त्याने फुलपुर लोकसभेची सीट लढवली व तिथून खासदार बनून संसदेत गेला. त्यामुळे आमदारपद रिकामे झाले व त्यासाठी पोटनिवडणूक झाली ज्यात राजू पाल ने अतिक अहमद च्या भावाला खालिद अझीम (उर्फ अशरफ) याला हरवले. 


१. २००५ साली राजू पाल याचा खून अतिक अहमद ने घडवून आणला. कारण राजू पाल ने अलाहाबाद(प्रयागराज) पश्चिम विधानसभेची सीट अतिक अहमद च्या भावाला हरवून जिंकली होती. आपला वचक कमी होऊ नये यासाठी राजू पाल ची हत्या केली. सुमारे २४ जणांनी मिळून राजू पाल च्या शरीराची गोळ्या घालून चाळणी केली. इतकेच नव्हे तर राजू पाल ला दवाखान्यात नेत असताना पाठलाग केला व तो जिवंत राहील कि काय या भीतीने परत त्याच्यावर गोळ्या झाडल्या. राजू पाल सोबत असलेल्या आणखी दोघांचा मृत्यू झाला. दिवसाउजेडी झालेल्या या घटनेचा साक्षिदार होता उमेश पाल. राजू पाल ज्या गाडीत होता ती गाडी उमेश पाल चालवत होता. 


२. उमेश पाल चे २००६-७ मध्ये अतिक अहमद ने अपहरण करून राजू पालखुनाच्या खटल्यात साक्षी देऊ नये म्हणून दमदाटी केली. 


३. २४ फेब्रुवारी २०२३ म्हणजे या वर्षी, उमेश पाल ची भर दिवसा प्रयागराज च्या रस्त्यांवर हत्या करण्यात आली. याचे व्हिडीओ फुटेज क्लिअर कट उपलब्ध आहेत. ज्यात सहा सात व्यक्ती उमेश पाल वर बंदुका व बॉम्ब ने हल्ला करत असल्याचे स्पष्ट दिसून येते. या व्हिडिओत अतिक अहमद चा मुलगा असद हा उमेश पाल वर गोळ्या चालवत आहे असे दिसले. या हत्याकांडात जे सामील होते त्यांचा युपी पोलिसांनी तपास लावला. 


४. उमेश पाल ची हत्या आपणच घडवून आणल्याची कबुली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अतिक अहमद ने चौकशी च्या दरम्यान दिली. यात त्याची पत्नी शाईस्ता हिने अतिक अहमद चे प्लॅनिंग प्रत्यक्षात घडवून आणण्यास मदत केली. यात पैसे, शूटर्स व हत्यारांची सोय करणे अशी कामे होती. शाईस्ता सध्या फरार आहे. 


४. २७ फेब्रुवारीला अरबाजला पोलिसांनी एन्काउंटर मध्ये मारले. 


५. ६ मार्च ला उस्मान चौधरीचे पोलीस एन्काउंटर झाले. 


६. १३ एप्रिल ला अतिक चा मुलगा असद चा पोलीस एन्काउंटर झाला 


७. १५ एप्रिल ला अतिक अहमद व त्याचा भाऊ अशरफ (उर्फ खालिद अझीम) यांची पोलिसांच्या गराड्यात असतांना गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हे सर्व चित्रण टीव्ही चॅनेल च्या कॅमेऱ्यात आले असून हल्लेखोरांनी जय श्री राम च्या घोषणा दिल्या असल्याचे व्हिडिओत ऐकू येत आहे. 


या घटनेवर जोरदार राजकारण होईल. जे आधीच सुरु झालेले आहे. त्या राजकारणी कुरघोडी सदृश्य पोस्टींचा आता पूर येईल त्यात वाहून न जाता तटस्थपणे राजू पाल च्या हत्येपासून सुरु झालेला गेल्या १८ वर्षाचा इतिहास बघावा. 


उत्तर प्रदेशात गेल्या कित्येक दशकांपासून काय परिस्थिती आहे हे सगळ्यांना माहिती आहे. यातून कोणताही पक्ष आणि त्याचे नेते अपवाद नाहीत. 


अतिक अहमद हे उत्तर प्रदेशातल्या गुन्हेगारी महाग्रंथाचे केवळ एक पान आहे. अशी अनेक पाने अजून फडफडत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad