डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अर्धापूर तालुक्यातील शाळांमध्ये एक तास वाचन उपक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंतीनिमित्त अर्धापूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये अभिवादन करण्यात आले.
जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांकडून वाचन घेण्यात यावे असे आदेश दिले होते. त्यास अनुसरून
गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या सुचनेनुसार अर्धापूर तालुक्यातील शाळांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एक तास पुस्तक वाचन उपक्रम सर्वच शाळांमध्ये घेण्यात आला. शालेय ग्रंथालयातील विविध महापुरुषांची पुस्तके विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्याकडून एक तास वाचन घेण्यात आले.
विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सुध्दा या उपक्रमात सहभाग घेतला. व नांदेड जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अमरभाऊ राजूरकर ,माजी मंत्री डि.पी.सावंत साहेब,आ मोहन अण्णा हंबर्डे,माआ.ओमप्रकाशजी पोकर्णा ,नांदेड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष गोविंद मामा नागेलीकर,डॉ.मीनल पाटील खतगावकर(वरिष्ठ उपाध्यक्षा-नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी),अनिलजी मोरे,सरजीतसिंगजी गिल,दीपक पावडे,युवक काँग्रेसचे पप्पू पाटील,संतोष देवराये,मनोहर पवार,सुरेंद्रजी घोडजकर,रोहिदासजी जाधव,कैलास राठोड,सौ.रेखाताई चव्हाण,सह महिला,पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते...!!