ढाणकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.
घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आज ढाणकी येथे ठिकठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.जागोजागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा असे बॅनर चौका चौकात लावण्यात आले होते. गावात जागोजागी निळी पताका लावण्यात आली होती. गावातून मुख्य मिरवणूक मार्गाने अतिशय उत्साहात भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. ट्रॅक्टर वर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा फोटो लावण्यात आला होता. ट्रॅक्टर हे फुगे,झिल, लाइटिंग यांनी सजवली गेले होते. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा अधिकच प्रसन्न दिसत होती. डी. जे. च्या तालावर तरुण,तरुणींनी ठेका घेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी लावण्यात आली होती.गावातील असंख्य भीम सैनिक ,महिला मंडळ उपस्थित होते.गावात अनुचित प्रकार घडू नये याकरिता चोक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.अतिशय शांततेत आंबेडकर जयंती पार पडली गेली.