Type Here to Get Search Results !

ठाकरे घराण्यावरील प्रेमापोटीच शिवसेनेत प्रवेश केला आमदार शहाजी बापू पाटलांची तुफान टोलेबाजी



ठाकरे घराण्यावरील प्रेमापोटीच शिवसेनेत प्रवेश केला आमदार शहाजी बापू पाटलांची तुफान टोलेबाजी


काय झाडी. काय डोंगार. काय हॉटेल या डॉयलॉगमुळे राज्यभरात चर्चेत आलेले सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील पुन्हा एकदा आपल्या भाषणा दरम्यान केलेल्या फटकेबाजीमुळे चर्चेत आले आहेत. भाषणात त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावरील प्रेमा पोटीच आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे जाहीर सांगितले तर कोण कुठेही असले तरी शेवटी शरद पवारांच्या फांद्या असल्याचे सांगत शरद पवारांवर आपली किती निष्ठा आहे हे ही त्यांनी स्पष्ट सांगितले. राजकारणात कुण कणाचं नसतं सगळ्यांना गोड बोलून काम करावी लागतात शरद पवार, शिंदे साहेब यांच्यासह अनेक राजकीय नेत मला आपलंसं मानतात असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

काँग्रेस मला काहीच कमी नव्हते सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे पहिले तिकीट आठ दिवस अगोदर जाहीर व्हायचं नंतर विजयसिंह मोहिते पाटील सुधाकर परिचारक यांच्यासह इतर नेत्यांची तिकीट जाहीर व्हायची इतकं सगळं मला काँग्रेसने दिल्यानंतर ही मी केवळ ठाकरे घराण्यावरील प्रेमापोटीच शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेवर प्रेम नसतं तर मी शिवसेनेत गेलो नसतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad