हैदराबादचा कोलकत्ता नाईट रायडर्सवर दणदणीत विजय
कोलकाता विरुद्ध हैदराबाद आयपीएलच्या या हंगामातील 19 वी लढत ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आली. हैदराबादने 23 धावांनी विजय मिळवला.
कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
हैदराबादचा सलामीवीर हॅरी ब्रुकने 100 (55) मोसमातील पहिली शतकी खेळी केली. कर्णधार मार्करमने अर्धशतक झळकावले. 229 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाताला मार्को जेनसेनने सुरुवातीला हादरे दिले.
कर्णधार नितीश राणा 75 (41) व रिंकू सिंह 58 (31) यांचे प्रयत्न अपुरे पडले.