Type Here to Get Search Results !

टेंभुर्णी महाडवरून ज्योत घेऊन येताना झालेल्या बाचा बाचीचा राग मनात धरून दगडफेक चौघांवर गुन्हा दाखल



टेंभुर्णी महाडवरून ज्योत घेऊन येताना झालेल्या बाचा बाचीचा राग मनात धरून दगडफेक चौघांवर गुन्हा दाखल


महाडवरून ज्योत घेऊन येताना झालेल्या बाचाबाचीचा राग मनात धरून टेंभूर्णी येथे ज्योत आल्यानंतर कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली. यानंतर चौघांवर टेंभूर्णी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, महाड येथून ज्योत आणण्यासाठी येथील कार्यकर्त्यांचे वेगवेगळे दोन गट गेले होते. यातील एका गटाची ज्योत टेंभुर्णी येथील अकलूज चौकात आल्यानंतर अचानक दगडफेक चालू झाली. त्यामध्ये दशरथ दीपक लोंढे (वय २०) रा. सिद्धार्थनगर, टेंभुर्णी व अविनाश खरात हे दोघे जखमी झाले. घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर घटनास्थळी दाखल झाले. याचवेळी शिंदे सेनेचे संजय कोकाटे व भाजपाचे माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी करून सर्व कार्यकर्त्यांची समजूत काढल्याने पुढील अनर्थ टळला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad