Type Here to Get Search Results !

मंगळवेढा | भाळवणी ट्रॅक्टर अंगावर पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू



मंगळवेढा | भाळवणी ट्रॅक्टर अंगावर पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू


मंगळवेढा तालुक्यात भाळवणी हद्दीत हा अपघात झाला आहे. ट्रॅक्टर अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टर खड्यात गेल्याने अंगावर पडून एका शेतकऱ्याने आपले प्राण गमावले आहेत.


सुभाष रामहरी गायकवाड हे त्यांचे शेतात टॅक्टर चालवित घराकडे येत असताना शेतातील खड्यात टॅक्टरचा तोल जावुन अंगावर पडून टॅक्टरचे बोणेट पडल्याने त्यात ते गंभीर जखमी होवुन स्वतः चे मयतास व टॅक्टरचे किरकोळ नुकसानिस कारणीभुत झाला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

मयत सुभाष रामहरी गायकवाड हे आपल्या घरातील टॅक्टरने शेतातून येत असताना सदरचा टॅक्टर हा शेतातील खड्यात पलटी होवुन टॅक्टरच्या बोणेट खाली सापडुन गंभीर जखमी झाले होते. आजु-बाजुच्या लोकांच्या मदतीने टॅक्टर उचलुन त्यांना बाहेर काढून उपचारा करीता रुग्णालयात आणत असताना वाटेतच त्यांना मृत्यूने गाठले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies