Type Here to Get Search Results !

पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या हस्ते "विक्रमगड प्रज्ञा शोध" पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न


पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या हस्ते "विक्रमगड प्रज्ञा शोध" पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न


मोखाडा प्रतिनिधी-सौरभ कामडी 


पालघर(विक्रमगड)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्ताने शैक्षणिक मार्गदर्शन आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे मोफत वितरण करण्यात आले.

   या आदिवासी दुर्गम भागात भविष्यात अधिकारी वर्ग या तालुक्यात पालघर जिल्ह्यात घडावे हा एकच ध्यास बाळगून ज्ञानाची ज्योत तेवत राहील हे ज्योत तेवत ठेवण्यासाठी शिक्षण वर्ग काम करेल प्रज्ञाशोध आठवीसाठी NNMSपरीक्षा आहे त्यासाठी 48 हजार शिष्यवृत्ती भेटते प्रतिवर्ष 12000 प्रमाणे त्याची पूर्वतयारी या पुस्तकातून होते,त्या दृष्टीने वाटचाल नवोदय साठी ग्रामीण भागातील विद्यार्थी जावावा त्याची तयारी पाचवीला व्हावी यापूर्वी तयारीच्या दृष्टीने चौथी चे पुस्तक बनवले आहे,स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून छोट्या छोट्या टिप्स या पुस्तकाच्या माध्यमातून दिलेले आहेत.

     "विक्रमगड प्रज्ञाशोध" पुस्तकासाठी विक्रमगड तालुक्यातील अनेक शिक्षक वृंदांनी परिश्रम अभ्यास करून तयारी केली व हे प्रकाशित करण्याचा आर्थिक खर्च काश फाउंडेशन,विपला फाउंडेशन,लार्सन अँड टुब्रो व अनेक एनजीओ संस्था यांच्या सहकार्यातून करण्यात आला हजार पुस्तके छापण्यात आली जेणेकरून प्रत्येक शाळेला एक देण्यात येईल.

    या कार्यक्रमाप्रसंगी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे सभापती कृषी व पशुसंवर्धन संदीप पावडे सभापती बांधकाम व आरोग्य विभाग संदेश ढोणे विक्रमगड सभापती व पंचायत समिती सदस्य गटविकास अधिकारी विक्रमगड तालुक्यातील शिक्षक वृंद होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad