सुनेने केला सासुचा गळा आवळुन खुन
शनिवारी (८ एप्रिल) सायंकाळी पावणेआठच्या निर्मला महादेव धनवे (वय ५५) महिलेचा राहत्या घरी मृत्यू नव्हे तर खुन झाल्याचे समोर आले. हा खुन कोणी दुसरा तीसर्याने केला नसुन घरातील सुनेनेच डोक्यात काहीतरी मारून गळा आवळुन मारल्याचे शवविच्छेदन वैदयकिय अहवालात समोर आले आहे.याबाबत शहर पोलीसात सुने विरुद्ध ३०२ चा गुन्हा दाखल झाला आहे.
कोमल अनिल धनवे रा.सोलापूर रोड मनोहर बगले चाळ बार्श वय 21 वर्ष, या आरोपी सुने विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अधिक माहिती अशी की दि.८ एप्रिल रोजी सायंकाळी ७:४५ मी च्या दरम्यान राहत्या घरी सासू निर्मला धनवे महिलेचा मृतदेह समोर आला याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली आहे. निर्मला धनवे यांचा मृतदेह शवविच्छदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
डॉ. रवींद्र माळी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर आज आलेल्या वैदयकिय अहवालात त्या महीलेचा मृत्यु हा डोक्यास गंभीर जखम व गळा आवळुन झाल्याचे समोर आले.दरम्यान त्या दिवसांपासुन निर्मला धनवे या महिलेची 'हत्या' की आत्महत्या? याबाबत परिसरात जोरदार चर्चा सुरू होती.
मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा तेथील नागरिकांमध्ये होती. अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित नातेवाइकांना पोलिस ठाण्यात बोलावून माहिती घेत पोलीस तपासामध्ये यातील मयत निर्मला महादेव धनवे यांचे मागील आठ दिवसापासून पैसे व मिनीगंठन चोरल्याचे कारणावरून सासु निर्मला व सुन कोमल यांचेत वाद चालु होता.
सुन कोमल हिने पैसे व मिनीगंठन चोरल्याचे सासु निर्मला हिस माहित झाल्याचे कारणावरून ८ एप्रिल रोजी ५:३० ते ६:३० वाजण्याच्या दरम्यान कोमल अनिल धनवे हिने घरामध्ये कोणी नसताना मयत सासुचा गळा आवळून डोक्यात जखम करून मारून टाकले केलेला खुन लपवण्यासाठी कुभांड रचत मयत निर्मला हि पडून जखमी होवून मुत्यु झाल्याचा बनाव केल्याचे अहवालानंतर निष्पन्न झाले.
यातील आरोपी सुन कोमल धनवे हिस पोलिसांनी अटक केली असुन याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल अधिक तपास करीत आहेत