चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स रोमहर्षक लढतीत राजस्थानने चेन्नईला नमवले
इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एका रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 3 धावांनी पराभव केला.
शेवटच्या षटकात सुपर किंग्जला विजयासाठी 21 धावा करायच्या होत्या.
राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 176 धावांचे लक्ष्य दिले होते.
एमएस धोनीला शेवटच्या चेंडूवर पाच धावा काढायच्या होत्या, पण धोनी संदीप शर्माच्या यॉर्करला षटकारात रूपांतरित करू शकला नाही.
शेवटची चेंडू वरती दोन धावा निघाल्या त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स तीन धावांनी पराभूत झाले.