जव्हार मोखाडा मध्ये वादळी वाऱ्याने नागरिक झाले हैराण.
जव्हार प्रतिनिधी :- सुनिल जाबर
जव्हार शहरा पासून काही अंतरावर नांदगाव ग्रामपंचायत मध्ये रात्रीच्या अवकाळी पावसामुळे कौलाले गटातील नांदगाव ग्रामपंचायत मधील सौ.लक्ष्मीबाई यशवंत करनोर यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती नांदगाव ग्रामपंचायत चे सदस्य पुंडलिक करणोर व संतोष भला यांनी दिली असता.
आज सकाळी सदर घराला भेट देत पाहणी करून महसूल विभागाचे या भागाचे तलाठी कोरडे तात्या व जव्हार तहसीलदार आशा तमखेडे मॅडम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तत्काळ पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी केली व त्याच बरोबर तालुक्यात गेल्या पावसाळ्यात घरे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याची सुद्धा भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणीही केली. काल देखील याच प्रकारची घटना आपल्याला मोखाडा तालुका मधून आली आहे आणि आज देखील जव्हार मध्ये घडली असून आता वादळी वाऱ्याने नागरिक हे खूप हैराण झाले आहेत .यावेळी बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा,ग्रामपंचायत सदस्य संतोष भला,पुंडलिक करनोर,माजी सरपंच संजय भला,बाबू गिरांधले उपस्थित होते.