ध्येय वेड्या तरुणाने साकारले रेल्वे पोलीस होण्याचे स्वप्न
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
देवळा तालुक्यातील वाखारी येथील श्री .भाऊसाहेब मोतीराम आहिरे यांचे लहान बंधु कु. युवराज मोतीराम आहिरे या तरुणाने अंत्यत गरीब व हालाकीचे जीवन जगत असतांना रेल्वे पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अपार मेहनत व जिद्दीच्या जोरावरच स्वप्न सत्त्यात उतरवले या कामी मध्ये रेल्वेत इगतपुरी येथे कार्यरत असलेल्या भाऊ भाऊसाहेब आहिरे यांची अनमोल साथ लाभली
वडील वारल्यानंतर दोन वर्षात नंतर आईचे हि निधन झाले ह्या मातृ पितृ हरपलेल्या युवराज याने आपल्या चरीतार्थ होमगार्ड तसेच आपला व्यवसाय सांभाळून गावातील मोकळ्या जागेत शारीरिक कसरत करून व कोणत्याही क्लासेस जॉईन न करता केवळ जिद्द व मेहनतीच्या जोरातर आपले ध्येय गाठले
युवराजच्या रेल्वे लोहमार्ग पोलीस दलात भरती झाल्यानें वाखारी ग्रामस्थांनी व मित्र परीवाराने तसेच समाज बांधवानी त्यांचे हार्दिक अभिनंदन करत कार्याचे कौतुक केले