रयत शिक्षण संस्थेने आदिवासींच्या उन्नति करिता सर्वात मोठे शैक्षणिक योगदान दिले- खा. शरद पवार
मोखाडा प्रतिनिधी :सौरभ कामडी
मोखाडा: रयत शिक्षण संस्थेने आदिवासींच्या शैक्षणिक उन्नति करिता मोठे योगदान दिले असून यापुढेही योगदान देत राहु असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. ते लोकनेते रामशेठ ठाकुर कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखाडा येथे नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.मि राज्याचे नेतृत्व करत असताना एकंदरीत राज्यात अदिवासींची लोकसंख्या आहे त्या प्रमाणात अदिवासींच्या हिताची तरतूद केली पाहिजे यासाठी राज्याच्या बजेट मधील आदिवासिंच्या विकासासाठी ९% रक्कम खर्च केली जावी या बाबत तरतूद करण्यात आली. परंतु याची आता अंमलबजावणी होत नसल्याने काहीसी नाराजी देखील व्यक्त केली.पुढे बोलताना त्यांनी सांगितले की शिक्षण क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटिल यांसारखा झोकून देणारा दूरदृष्टि नेता महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचे भाग्यच मानावे लागेल.
त्यांनी ही शिक्षणाची ज्ञान गंगा घरोघरी पोहचविण्याचे महान कार्य केले.
एका शाळेपासून झालेली सुरवात आज संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षणाचे मोठे वटवृक्ष निर्माण केले असल्याचे पवारांनी सांगितले
रयत शिक्षण संस्थेने विद्यार्थी घडविन्याचे काम जेवढे केले आहे देशामध्ये कोणत्याही संस्थेने केले नाही.पुढे बोलतानी पवार यांनी सांगितले की यामध्ये मुख्य उद्देश समाजातील कुटुंबातील विद्यार्थ्यांचा शिक्षण घेऊन उद्धार झाला पाहिजे तसेच फुले,शाहू, आंबेडकर व कर्मविरानी देशाला दिशा देण्याचे काम केले आहे.आपण नेहमीच फुलेंचे नाव घेतो फुले दापंत्यांनी शिक्षणा बरोबरच समाजाला अधिनुकतेचे धडे दिले असल्याचे असे सांगितले.
तसेच शिक्षणासाठी एकत्र येवून प्रयत्न केले पाहिजे.रामशेठ ठाकुर सारखी माणस शैक्षिणिक क्षेत्रात ओघाउन देतात ही बाब अभिमानास्पद आहे.कर्मविरांच्या शिकवनितुन ' कमवा व शिका' या संकल्पनेतून ते शिकले त्यांची व्ययक्तिक प्रगती करुन संस्थेच्या जडन-घडनीत त्यांनी हातभार लावला. रामशेठ ठाकुर हे संस्थेच्या मदतिसाठी नेहमिच अग्रेसर असतात. रामशेठ ठाकुर यांच्या दातृत्वामुळेच मोखाड्यात शिक्षणाचे संकुल उभे राहिले असल्याचे त्यांनी असे शेवटी बोलताताना सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घटान शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले तर नामांकरनाचे उद्घाटन दिलीप वळसे पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटिल हे होते . यावेळी प्रमुख उपस्थिती पालकमंत्री रविंद्र चव्हाण,भागिरथ शिंदे,आमदार प्रशांत ठाकुर,जेष्ठ पत्रकार मधुकर भावे,खासदार राजेंद्र गावित,आमदार सुनील भुसारा, जि. प अध्यक्ष प्रकाश निकम, मोखाडा नगराध्यक्ष अमोल पाटिल,पं. स सभापति भास्कर थेतले, जि. प सदस्या सारिका निकम आदी मान्यवर व तसेच मोठ्या संख्येने जनसमुदाय यावेळी उपस्थित होता