सावरखुट गावाला वाॅटर व्हिल चे वाटप...
मोखाडा प्रतिनिधी :सौरभ कामडी
शहापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत अजनुप- दापुर मधील अत्यंत दुर्गम भागात वसणाऱ्या सावरखुट गावाला माऊली ग्रुप ऑफ डोंबिवली च्या सावरखुट गावात जाण्यासाठी मुख्य रस्ता नाही अशा गावात या ग्रुपने तब्बल ४.०० किमी अंतर पायी प्रवास करून जाणून घेतल्या समस्या गावाजवळ हाकेच्या अंतरावर मध्य वैतरणा धरणं असून सुद्धा गावात पिण्याच्या पाण्यासाठी गावातील महिलांना पाण्यासाठी दिवसातील तब्बल ६ तास प्रवास करावा लागत होता डोक्यावर ३/४ हांडे घेऊन जवळ जवळ २ ते २:५० किमी दिवसातून ३ वेळा प्रवास करावा लागत होता तेव्हा कुठेतरी पिण्यासाठी पाणी मिळायच नदीवर जाव लागत होते . हीच गंभीर बाब लक्षात घेऊन माऊली ग्रुपचे सर्वेसर्वा कोलारकर सर यांनी या गावातील लोकांना तीन हजार किमतीचा प्रत्येकी एक असे वीस वॉटर व्हील आपल्या ग्रुपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले व तेथील महिलांच्या डोक्यावरील ओझ हातात .आणलं या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य कु.अजय कथोरे सदस्य.अनंता वारे व मोहन फसाळे उपस्थित होते..