Type Here to Get Search Results !

अकलुज | महिला पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण



महिला पोलीस कॉन्स्टेबल ला मारहाण


दि. 7 एप्रिल 2023 रोजी यशवंतनगर येथील धवलसिंह मोहिते-पाटील अँग्रो इं. लि. या पॉपर्टीचा ताबा घेण्याची कार्यवाही चालु होती. महिला पोलीस कर्मचारी नाजमीन तांबोळी या कर्त्यव्य बजावत होत्या. त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या महिला अकलुज शहराध्यक्षा शैला गोसावी व पोलीस कर्मचारी नाजमीन तांबोळी यामध्ये बाचाबाची होवुन प्रकरण थेट हाणामारीपर्यंत पोहचले.

शैला गोसावी यांनी हातातला दगड थेट तांबोळी यांच्या डोक्यात बसला (कसा हा तपासाचा भाग आहे. ) महिला पोलीस रक्ताने न्हाल्या. त्याचवेळी गोसावी यांनांही पोलीसांचा प्रसाद मिळाला. प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर पो. नी. दिपरतन गायकवाड यांच्याकडे अंगुली निर्देश करीत आपणाला खुप बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप शैला गोसावी यांनी केला.

तर गोसावी यांनी सरकारी कामात आडथळा आणुन सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. तसेच कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलीसाला मारहाण केल्याच्या आरोपाखाली रघुनाथ साठे, वैभव लोखंडे, मंगेश साठे, मयुर माने यांचेसह 3-4 अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad