माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त आयुष्यमान भारत कार्ड वाटप.
मा. खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधिलकी जपत मा.आ बबनराव शिंदे व सोलापुर जिल्हा दुध संघाचे चेअरमन, मा.श्री.रणजीत (भैया) शिंदे यांच्या संकल्पनेतुन माढा विधानसभा मतदार संघात मोफत प्रत्येक गावात आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.
टाकळी (टें) ता.माढा जि.सोलापूर येथे शनिवार दि. ०१/०४/२०२३ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ग्रामपंचायत ऑफिसमध्ये आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्यात आले होते. या योजनेचा फायदा म्हणजे, या कार्ड वरती पाच लाख रुपये पर्यंतचा दवाखाना मोफत उपचार होणार आहे तरी यामध्ये टकळीतील ७० ग्रामस्थांनी लाभ घेतला. यावेळी टाकळी गावचे सरपंच सत्यवान जरक उपसरपंच दत्तात्रय माने, ग्रामपंचायत सदस्य सदस्य तानाजी सलगर, त्याचबरोबर पांडुरंग आबा घाडगे, राजेंद्र राजमाने, आदी मान्यवर उपस्थित होते, उर्वरित ग्रामस्थांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी टाकळी (टें) ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष व तसेच ग्रामपंचायत सदस्य सलगर यांनी केले आहे. तानाजी सलगर हे समाजकार्यासाठी कोंढार भागात अग्रेसर असतात.