दगडफेकीत भाजप आमदार जखमी
पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर असे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. हावडा आणि उत्तर दिनाजपूरमधील हिंसाचारानंतर आज हुगळीतील हिंसाचाराचे प्रकरण समोर आले आहे. हुगळीत भाजपतर्फे रामनवमीच्या थीमवर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे. मिरवणुकीत दोन गट एकमेकांना भिडले. दगडफेकीत भाजपचा एक आमदार जखमी झाला असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.