जिल्हा परिषद शाळा सावर्डे या शाळेला ग्रीन फाऊंडेशन यांच्याकडून विविध साहित्याचे वाटप.
मोखाडा प्रतिनिधी - सौरभ कामडी
मोखाडा - शाळा म्हटले की आपल्याला विविध गोष्टींची आवश्यकता असते. ती म्हणजेच साहित्याची या साहित्याच्या साहाय्याने शाळेतील विद्यार्थी योग्य त्या कला प्रदर्शित करतात त्या मधून या कलेमधून विद्यार्थांना प्रोत्साहन मिळत असते आणि त्या आनंदाने ते विद्यार्थी योग्य त्या चांगल्या मार्गाला लागतात आणि त्या साठी आपल्याला म्हणजेच शाळे तील विद्यार्थांना योग्य त्या साहित्याची गरज असते त्यासाठी विविध ठिकाणचे फाऊंडेशन मदत करत असतात अश्याच प्रकारे जिल्हा परिषद शाळा सावर्डे येथे मुख्याध्यापक श्री संतोष बोंद्रे सर यांच्या विनंती वरून ग्रिन फाउंडेशन यांनी शाळेला कॉम्पुटर बॅग ,वॉटर बॅग गेम ,पेन पेन्सिल अंगणवाडी मुलांना साहित्य वाटप करण्यात आले . ग्रिन फाउंडेशन चे सदस्यव व बोंद्रे सर यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची एक अनोखी भेट देत , विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व गुणवत्ता वाढवण्यासाठी हा उपक्रम राबविला या वेळी संस्थेचे अध्यक्ष उमेश जोशी.
मा. मिस्री. मा पाटोळे.87 वर्षीय कोनगावकर काका
यांनी आपल्या जुन्या आठवणी ला उजाळा देत , त्यांनी शिक्षण कसे घेतले ,तुम्ही शिक्षण घेऊन पुढे जा आसे मोलाचे मारगदर्शन केले.या प्रसंगी ग्रिन फाउंडेशन चे सर्व सदस्य.व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमंत पादीर, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी संस्थेचे आभर मानले