दंगलीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात
छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीवरून राजकीय पक्षांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता भाजप खासदार अनिल बोंडेंच्या आरोपांनी राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी नेते अब्दुल कादीर निवडणुक लढवण्यास उत्सुक आहेत. त्यांचा मुलगा रियाजुद्दीन व मौलाना कादीर यांचे फोन कॉल्स तपासले पाहिजेत. या दंगलीमागे कोणत्या राष्ट्रवादीच्या नेत्याची फूस होती हे तपासाअंती समोर येईल. असे खासदार अनिल बोंडे खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.