Type Here to Get Search Results !

ॲड दिलीप ठाकूर यांच्याकडून भ्रमिष्ट लोकांचे दाढी कटिंग व नवीन कपडे देऊन गेल्या 27 महिन्यापासून सेवा करत आहेत



गेल्या २७ महिन्यापासून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या कायापालट या उपक्रमात आतापर्यंत एक हजारापेक्षा जास्त भ्रमिस्टांची कटिंग दाढी करून स्वच्छ पाण्याने अंघोळ घातल्यानंतर नवीन कपडे व शंभर रुपयाची बक्षिसी देण्याची सेवा म्हणजे म्हणजे मानव सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे सर्वोत्तम उदाहरण असल्याचे प्रतिपादन नांदेड जिल्हा माहेश्वरी सभेचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड.चिरंजीलाल दागडिया यांनी केले.




दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे कायापालट उपक्रम गेल्या २७ महिन्यापासून अखंडित सुरू आहे.खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, लायन्स प्रांतपाल दिलीप मोदी, रीजनल चेअरपर्सन योगेश जयस्वाल मार्गदर्शक यांच्या अरुणकुमार काबरा, सुरेश शर्मा,महेश शिंदे,संजयकुमार गायकवाड यांनी शहरातील विविध भागातून स्वतःच्या दुचाकीवर भ्रमिष्ट, कचरा वेचणारे, अपंग, बेघर व्यक्तींना बसून आणले. बालाजी खोडके यांनी सर्वांची दाढी कटिग केली. बालाजी मंदिराचे कैलास महाराज वैष्णव यांच्या कडून स्वच्छ पाण्याने स्नान करण्याची व्यवस्था करण्यात आली.




कित्येक दिवस आंघोळ न करणाऱ्या या नागरिकांना निलेश पै आणि रामशरण चौधरी यांनी साबण लावून स्नान घातले. त्यानंतर अंडरपॅन्ट, बनियन व पॅन्ट शर्ट मिळाल्यामुळे सर्वजण खुश झाले. भ्रमिष्ट मंडळींचा कायापालट होण्यासाठी तयार व्हावे म्हणून शंभर रुपयाची बक्षिसी व चहा फराळाची व्यवस्था करण्यात येते.पूर्वीचे मळके कपडे, अवास्तव वाढलेले केस व नंतरची चकाचक करण्यात आलेली कटिंग,दाढी व नवीन कपडे घातले. हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी अनेक नागरिकांची सदिच्छा भेट.दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी उपक्रम राबविणार असे सांगितले' अशा बेघर व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती द्यावी. असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News