Type Here to Get Search Results !

ढाणकीत राजकीय भूकंप,तब्बल १११ युवकांनी घेतला काँग्रेसमध्ये प्रवेश



ढाणकीत राजकीय भूकंप,तब्बल १११ युवकांनी घेतला काँग्रेसमध्ये प्रवेश

ढाणकी प्रतिनिधी, दिगांबर शिरडकर

दि.०२/०४/२०२३/रविवार ला असंख्य तरुणांनी भाजप विषई नाराजी व्यक्त करीत ,१११तरुणांनी काँग्रेसमध्ये आज जाहीर प्रवेश केला. यांचे श्रेय जाते ते म्हणजे महाराष्ट्र समन्वयक तथा ढाणकी शहर अध्यक्ष अमोल जी तुपेकर याना.अमोल तूपेकर , बाळू पाटील चंद्रे , गावातील काँग्रेस चे नेते व पक्षावर विश्वास ठेऊन तरुणांनी एकमताने ठराव करून भाजपवर नाराजी व्यक्त करीत तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्टॉप येथे जाहीर प्रवेश केला.या मुळे ढाणकी परिसरात सद्या चर्चा चालू आहे ती म्हणजे एकाएकी एवढे तरुण अचानक पने गेले कशे काय?असा प्रश्न सर्वत्र पसरत आहे.




काँग्रेस मध्ये जाण्याने काँग्रेस पक्षात अती उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे तर, दुसरीकडे भाजप मध्ये नाराजीचे सूर निघत आहे. एका पाठोपाठ दिग्गज नेते व तरुण कार्यकर्ते जात असल्यामुळे भाजपा ढाणकीतिल नेत्यांना यावर चिंतन, मंथन करण्याची गरज आहे.नवीन तरुण पिढी काँग्रेस पक्षात सामील झाली त्यामुळे नक्कीच पक्षाला याचा फायदा होईल .असे सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने बोलण्यात येत आहे.आता जरी काँग्रेस पक्षात प्रवेश केला गेला तरी सुध्दा याचा फायदा नगर पंचायत निवडणुकीतच दिसून येईल. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते दत्तरावजी शिंदे तालुकाध्यक्ष उमरखेड, तातू भाऊ देशमुख, गोपाल शेठ अग्रवाल, ईश्वर गोस्वामी,गजानन भारती, रामभाऊ देवसरकर, मीनाक्षी सावळकर,सुनीता घोडे, बाळासाहेब चंद्रे पाटील, युवराज देवसरकर , ढाणकी काँग्रेस शहर अध्यक्ष अमोल तुपेकर,खाजाबाई कुरेशी, बाबुभाई वेल्डिंग वाले ,साहेबराव वाघमोडे,रुपेश भंडारी ई.शेकडोच्या स्वरूपात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad