दहिवड येथे डोंगर दर्यात भिषण आग शेतकर्याचे अतोनात नुकसान
देवळा प्रतिनिधी दादाजी हिरे
दहिवड येथील रामनगर महसूल विभागात ओबारा वस्ती शेजारील डोंगर रांगांमध्ये भिषण लागलेल्या आगीत झाडाझुडपांसह लगतचेशेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाले
यामध्ये शेतकरी दादाजी नारायण पवार यांचे पिस्टन मशीन व ठिबक सिंचन च्या नळ्या पाण्याचे पाईप व गुरांसाठी असलेला चारा संपूर्णता जळून खाक झाला आहे तसेच त्यांच्या शेजारील भाऊराव महादू सोनवणे यांचेही पाईपलाईन साठी आणलेले पाईप केलेली पाईपलाईन त्यानंतर वीज पंप चालू करण्यासाठी टाकलेली वायर व जनावरांचा चारा यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे ही आग रात्री नांदूर टेक शिवारात लागली होती परंतु तिचा लोळ दहिवड परिसत येऊन तिने रौत्र रूप धारण केले असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे परंतु या आगीतून संपूर्ण डोंगरातील झाडे झुडपे, गवत व आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता हे नुकसान संबंधित विभागाने पंचनामा करून भरपाई करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे