'बच्चू कडूंना मंत्रिपद मिळणार नाही'
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा दुसऱ्या विस्ताराचा मुहूर्त काही केल्या ठरत नाही. त्यातच दुसऱ्या टप्प्यात तरी आपली मंत्रिमंडळात वर्णी लागावी, म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन करत सरकारला इशारा दिला होता. तसेच त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. मात्र बच्चू कडूंना आता मंत्रिपद मिळणार नाही, हे अख्ख्या महाराष्ट्राला कळाले आहे, अशी मिश्किल टिप्पणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.