Type Here to Get Search Results !

उपसभापती निलमताई गो-हेंच्या फलटण दौ-यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह : प्रदिप झणझणे, तालुका प्रमुख



उपसभापती निलमताई गो-हेंच्या फलटण दौ-यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह : प्रदिप झणझणे, तालुका प्रमुख


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वरिष्ठ नेत्या व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उप सभापती निलमताई गो-हे यांनी रामनवमी दिवशी फलटण दौरा केला होता. त्यामध्ये शासकीय विश्रामगृह फलटण येथे त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला होता. शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले, शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे व विकास नाळे आदी पदाधिकारी यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन निलमताई गोरे यांचा सर्व शिवसैनिकांच्या उपस्थितीत व घोषणांच्या गजरात फलटण नगरीत सहर्ष स्वागत केले. 


सर्व शिवसेना पदाधिकारी यांची निलमताई गो-हे यांनी यावेळी विचारपूस केली. पक्ष संघटना वाढीवर व त्यातील येणा-या अडथळ्यांवर चर्चा झाली. फलटण तालुक्यातील समस्या व विकासकामे यावर देखील चर्चा करण्यात आली. नुकतीच सुरु झालेली फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक महाविकास आघाडीमधुन एकत्रित लढण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी फलटण तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात व पक्ष संघटना आणखी मजबूत करावी. फलटण तालुक्यातील वरिष्ठ पातळीवरील समस्या व विकासकामे याबाबत शिवसेना कायम सकारात्मक आहे व सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे निलमताई गो-हे यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. निलमताई गो-हे यांच्या या सकारात्मक दौ-यामुळे आम्हा शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.


फलटण तालुका शिवसेना पदाधिकारी बैठकीनंतर निलमताई गोरे यांनी श्रीराम नवमीनिमित्त फलटण येथील प्रसिद्ध राममंदिरात जाऊन प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेतले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय भोसले, तालुका प्रमुख प्रदिप झणझणे व विकास नाळे, शहरप्रमुख निखिल पवार, ग्रा.सं. कक्ष जिल्हाप्रमुख विश्वास चव्हाण, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख विकास राऊत, आरोग्य सेनेचे पदाधिकारी शैलेश नलावडे, उपतालुका प्रमुख अभिजीत कदम, फलटण तालुका महिला आघाडीच्या सुशिला जाधव, झिरपवाडी ग्रामपंचायत सदस्या रेखा गुंजवटे, विभाग प्रमुख तुषार वाडकर, ग्रा.सं.कक्ष उपजिल्हा प्रमुख भारत लोहाना, ग्रा.सं.कक्ष तालुका प्रमुख सुर्यवंशी, माथाडी कामगार तालुका प्रमुख नंदकुमार काकडे, युवासेना माजी उपजिल्हा प्रमुख आदित्य गायकवाड, उपशहर प्रमुख राहुल पवार, शिवसेना शहर संघटीका लता तावरे, शाखाप्रमुख अक्षय तावरे, मंगेश खंदारे, गणेश चोरमले, प्रशांत निंबाळकर, संतोष शिंदे, आदी सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News