मोखाड्यातील राजेवाडी शाळेला आय एस ओ मानांकन; जी. प. अध्यक्षांनी केले कौतुक
मोखाडा प्रतिनिधी:सौरभ कामडी
मोखाडा: कोणत्याही गावाची प्रगती व्हावी यासाठी शिक्षण ही अतिशय महत्त्वाची बाब आहे याच धर्तीवर बुधवारी मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा राजेवाडी शाळेने आय एस ओ मानांकनाचे सर्व निकष पुर्ण केल्याने मान्यवरांचे हस्ते मुख्याध्यापक रविंद्र पांडुरंग विशे यांना प्रमाणपत्र देऊन जिल्हा परिषद शाळा राजेवाडी आय एस ओ झाल्याचे घोषित करण्यात आले.
या प्रसंगी आय एस ओ चे प्रमुख अनिल येवले यांनी राजेवाडी शाळा आय एस ओ चे निकष अतिशय उत्तम प्रकारे शाळेनी पुर्ण केले आहे. यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, पालक, महिला मंडळ, वारकारी मंडळ राजेवाडी व शिक्षक यांनी प्रचंड मेहनत घेतली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले व मुलांनी गुणवत्ता अतिशय चांगल्याप्रकारे असल्याचे व्यक्त करुन शाळेला शुभेच्छा दिल्या.
पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र विशे यांचे कौतुक करुन राजेवाडी शाळेला एक इमारत मंजूर केली जाईल असे आश्वासित केले. व तालुक्यातील शाळा या १००% आय एस ओ करण्याचे उपस्थित शिक्षकांना आवाहन केले ,तसेच मोखाडा तालुक्याचे सभापती थेतले यांनी देखील शुभेच्छा दिल्या.
पंचायत समिती सभापती प्रदीप वाघ यांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळकृष्ण पाटील यांनी राजेवाडी शाळेसाठी प्रचंड मेहनत घेतली व राजेवाडी शाळेचे मुख्यध्यापक यांनी सुट्टीच्या काळात देखील मुलांना जादावेळ देत गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. व विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मुलांना मोफत साहित्य मिळवून दिल्याबद्दल शाळेतील शिक्षकांचे कौतूक केले. व सर्व ग्रामस्थ व पालकांनी राजेवाडी गावासारखे एकञ आले पाहिजे असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी पालघर जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्या कुसूम झोले , सभापती थेतले, उपसभापती प्रदिप वाघ,मोखाडा पंचायत समिती चेे सदस्य सामाजिक कार्यकर्ते मिलिंद झोले , मोखाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदिप जाधव , गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, आदी उपस्थित होते.