Type Here to Get Search Results !

ढाणकी येथे पाण्यासाठी भटकती, पाण्यासाठी मोजावा लागत आहे पेट्रोलच्या वर खर्च.



ढाणकी येथे पाण्यासाठी भटकती, पाण्यासाठी मोजावा लागत आहे पेट्रोलच्या वर खर्च.


ढाणकी प्रतिनिधी,दिगांबर शिरडकर.


गावात पाण्यासाठी दाही दिशा भटक्ती करावी लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पाण्या वाचून जगणे कठीण म्हटले तरी हरकत नाही . गाडीने फिरण्यासाठी लागणारा खर्च शंभर रुपयात किमान तीन ते चार दिवस शंभर रुपयाचे पेट्रोल जाईल परंतु शंभर रुपये टाकी या दराने पाणी विकत घेतल्यास एका दिवसात शंभर रुपयाचे पाणी लागत आहे. ढाणकी पासून काही अंतरावर पैनगंगा नदी पात्र असून सुध्दा पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. नदी उशाला व कोरड घशाला अशी परिस्थिती गावची झाली आहे. वेळ असे बलवान मानवा वेळ असे बनवान |जिकडे तिकडे पाणीच पाणी गंगा वाहे चहू बाजूंनी थेंबासाठी जातो प्राण|| मानवा वेळ असे बलवान||१||. या संत हिराजी बापूयांच्या पदा प्रमाणे जरी गंगा चहू बाजूंनी वाहत असली तरी पाण्यासाठी जीव जाण्याची वेळ आज सर्व सामान्यावर येऊन ठाकली आहे. आमदनी अठान्नी खर्चानी रुपय्या या प्रमाणे दोनशे रुपये मजुरी मजुरांना मिळत आहे. त्यात शंभर रुपयाचे पाणी रोज विकत घेतल्यास उरलेल्या शंभर रुपयांमध्ये घर प्रपंच्याचा गाडा कसा हाकनार ?असा प्रश्न आम् जनतेला पडलेला आहे. मानवी गरजा अन्न ,वस्त्र व निवारा ह्या जरी मानल्या गेल्या असल्या तरी आज अन्ना वाचून कोणी ही उपाशी नाही, वस्त्रा वाचून कोणीही नागडा नाही आणि राहण्यासाठी ज्यांच्या त्यांचा ऐपतीने निवाऱ्यासाठी घर आहे. परंतु पीण्यासाठी पाणी नाही. दरवर्षीच नेतेमंडळींच्या डरकाळ्या असतात की, यावर्षी पाण्याचा प्रश्न हा निपटल्या जाईल किंवा मार्गी लागेल. ढाणकी पासून काही अंतरावरच अमडापूर डॅम आहे. तिथून पाईपलाईन करून पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल असे अनेक नेते मंडळी कडून ऐकावयास आले परंतु गेली अनेक वर्षांपासून जी समस्या आहे ती जैसे थे त्यामुळे पाण्याचा प्रश्न केंव्हा मिटेल कुणास ठाऊक. गावची लोकसंख्या प्ननास हजारांच्या आसपास आहे.परंतु गावात नळाचा पाणी पुरवठा आठ ते दहा दिवसाला एकदा होतो . त्यातच मजुरदाराला आपली मजुरी बुडून पाण्यासाठी घरी राहावे लागते. मे महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता व पारा आणखी वाढणार त्यामुळे पाण्याची सुद्धा तेवढ्याच प्रमाणात आवश्यकता भासणार एवढे नक्की राहिलेला मे व जून महिना पाणी पुरवठा करणे नगर पंचायत ला एक आव्हान असून या आव्हानास कितपत नगरपंचायत आव्हान पेलणार हे महत्त्वाचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad