सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह. साखर कारखान्याच्या निवडणुकीत 234 सभासदांचे नांव मतदार यादीतून वगळण्यात यावे अशा प्रकारची हरकत प्रारूप मतदार यादी प्रसिध्दीनंतर अभिजित पाटील गटाच्या वतीने घेण्यात आली होती.
त्यावर सुनावणी होवून प्रादेशिक सहसंचालक यांनी सदर सर्व सभासदांचे मतदानाचे हक्क कायम ठेवत या निर्णयामुळे अभिजित पाटील गटावर नामुष्की आली असून त्यांना निवडणुक काळात या सर्व सभासदांच्या रोषाला सामोरे जावे लागणार हे मात्र नक्की.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकी करीता कारखान्याने प्रादेशिक सहसंचालक सोलापूर यांचेकडे प्रारुप मतदार यादी सादर केलेली
सदर यादीतील मतदार यादीतून नांवे वगळण्यात यावीत यासाठी नितीन भारत पवार खेडभाळवणी यांनी- 29, रामचंद्र भगवान ढोबळे, केसकरवाडी यांनी- 27, नंदकुमार मधुकर फाळके मु.पांढरेवाडी यांनी -24, संदिपान निवृत्ती मोरे - 07, नागनाथ जनार्धन शिंदे - 08, नामदेव हणमंत पवार मेंढापूर यांनी - 05, गणेश गोपाळराव पाटील खरसोळी - 06, भारत मधुकर निंबाळकर गार्डी- 05, पांडुरंग गोपाळ घाडगे अजनसोंड-09,करोळे पांडुरंग आप्पा शिंगटे - 02, शेळवे मधुकर सुखदेव आसबे -07, पुळूज समाधान तुकाराम लोमटे -12, पळशी नंदकुमार पांडुरंग बागल - 02, वाडीकुरोली धनंजय उत्तम काळे -90 इ. एकूण 234
सभासदांची नांवे मतदार यादीतून वगळण्यात यावीत आशा हरकती घेतल्या होत्या त्यापैकी नंदकुमार मधुकर फाळके व मधुकर सुखदेव आसबे यांनी घेतलेल्या हरकती स्वत: हून माघारी घेतल्या.