कोकणातील बारसू रिफायनरीला स्थानिकांकडून मोठ्याप्रमाणात विरोध होत आहे.
त्यातच सरकारकडून पोलीस बळाचा वापर करून सर्वेक्षण केले जात आहे. मात्र हे सर्वेक्षण तात्काळ स्थगित करावे.
तसेच ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करा व त्यावर मार्ग काढा पोलीसबळाचा वापर करुन दंडुकेशाहीने सर्वेक्षण करु नका, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.
तसेच खारघरची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही पवारांनी केले आहे.