धडगांव तालुक्यातील थुवाणी येथे दुपारी एक वाजेच्या सुमारास कडक उन्हाच्या तडाक्यात सौलरच्या बॅटरीच्या केबलने पेट घेतल्यामुळे कौलारू घर जळुन घरातील घर बांधकाम साठी गोळा केलेले दिड ते दोन लाख रूपयासह चांदीचे दागिने व जीवनावश्यक वस्तू पुर्णपणे जळुन गेल्याची घटना आज दुपारी घटली यावेळी सुसाट्याच्या हवा देखील वेगात वाहत असल्याने आगीला अधिक गतीने पेट घेत पुर्णपणे घरातील साहीत्य जळुन निकामी झाल्याने कुटुंब उघड्यावर झाले आहे
थुवाणी येथील करश्या नार्या पाडवी यांच्या राहत्या कौलारू घराला दुपारी एक वाजेच्या सुमारास सौलरच्या बॅटरीच्या केबलला कडक उन्हाच्या तडाक्यामुळे पेट घेत कौलारू घराने देखील पेट घेतला यावेळी घरात पिजारीबाई करश्या पाडवी महिला एकटीच घरात झोपली होती मुले देखील बाहेर खेळायला गेले होते
यावेळी हवा देखील जोरात असल्याने आगीने अधिक गती घेत काही वेळातच संपुर्ण घर जळून निकामी झाले घरात घर बांधकामासाठी गोळा केलेले दिड ते दोन लाख रूपये,चांदीचे दागिने, धान्यसाठासह जीवनावश्यक वस्तूं देखील जळुन राख झाल्याने मोठे नुकसान होत कुटुंब उघड्यावर झाले आहे