डहाणू धानीवरी आदिवासी बाधितांच्या डोळ्यातून अश्रू अनावर ,बाधित आणि प्रशासनामध्ये वाद चिघळला.
जव्हार प्रतिनिधी :- सुनिल जाबर
पालघर जिल्ह्यात मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच काम सध्या युध्यपातळीवर सुरू असून आज भूसंपादनाच्या ठिकाणी प्रकल्प बाधित आणि प्रशासन यांच्यातला वाद चिघळलेला पाहायला मिळाला .मोबदला न मिळाल्याने प्रकल्प बाधित शेतकरी आपली घर सोडण्यास तयार नसल्याने घराबाहेर काढत या घरावर जेसीबी फिरवला .प्रचंड पोलीस बंदोबस्ताव हे काम सुरू करण्यात आल असून यावेळी पोलीस आणि प्रकल्प बाधित शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची देखील झाली.
घर खाली करण्यासाठी गेलेल्या पोलीस प्रशासनाचे थेट महिलांना घराबाहेर खेचत काढलं यावेळी प्रकल्प बाधित कुटुंबांनी आक्रोश केला असून आमची घर तोडल्याने आम्ही लहान मुलांना घेवून आता राहायचं कुठे अशा सवाल या प्रकट प्रकल्प बाधित कुटुंबांनी प्रशासनाला विचारला आहे.
तर शिंदे सरकार हे शेतकऱ्याच सरकार असल्याचं म्हणत असताना आमच्यासारख्या आदिवासी शेतकऱ्यावर अन्याय का ? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे.