माढा | देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधकांना एका दिवसात जमिनीवर आणण्याची ताकद - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
झेपत नसेल तर गृहमंत्री पद सोडावे अशी मागणी करणार्या विरोधांकाना एका दिवसात जमिनीवर आणण्याची ताकद देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे असे म्हणत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची खिल्ली उडविली.
महाविकास आघाडीची अस्तित्वासाठी चाललेली लढाई सुरू आहे. अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत भाजपने दरवाजे उघडे केले तर समोरच्या विरोधी पक्षात हाड म्हणायला एकही नेता शिल्लक राहणार नाही, असा दावा माढयाचे भाजपचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी आज केला.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमुठ या सभेवर ही निशाणा साधला विरोधकांची अस्तित्वासाठीची लढाई सुरू आहे. वारुळातून मुंग्या कशा बाहेर पडतात त्याप्रमाणे महाविकास आघाडी फूटू लागली आहे. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर जसा तडफडतो तशी अवस्था सत्ता गेल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची झाली आहे. भाजपाने दरवाजे उघडे केल्यानंतर विरोधी पक्षात एक ही नेता राहणार नाही.
दिवसाला 30 ते 35 कोटींचा निधी मतदार संघात आला आहे. आता पर्यंत सुमारे 40 हजार कोटींचा निधी मिळाल्याचा दावा ही खासदार निंबाळकर यांनी केला.