Type Here to Get Search Results !

नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल याच्या हस्ते सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळील बंधाऱ्याचे भूमिपूजन



नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल याच्या हस्ते सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळील बंधाऱ्याचे भूमिपूजन

ढाणकी : दिगांबर शिरडकर

औरंगाबाद- माहूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 - आय रस्त्याजवळ 1984 साली केंद्रीय अनुदानातून दत्ता वामन मिटकरे यांनी ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा योजनेला सदर जमीन दान दिली होती.या राष्ट्रीय महामार्गालगत अंदाजे 80 लाख किंमतीच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन सोहळा नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांचे हस्ते आज संपन्न झाला .

 ढाणकी वासियांना या बंधाराचा फायदा उन्हाळ्यात होणारी पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल आणि पाणी पातळी वाढल्याने या बंधाराचा

 फायदा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तसेच ढाणकी नगरपंचायतची वॉटर सप्लाय च्या विहीरीला सुध्दा   

होणार असल्यामुळे हा बंधारा ढाणकीवासियांसाठी वरदान ठरणार आहे.तसेच ढाणकीवासीयांना येत्या काळात नगरपंचायती एनआरपीची विहीर ते ढाणकी सबस्टेशन पासुन स्पेशल अकरा के.व्ही.लाईन मंजुरात करण्यात आली असून येत्या एका महिन्यात या लाईनचे काम होईल असे ढाणकीचे प्रथम नगराध्यक्ष सुरेशजी जयस्वाल यांनी या भूमिपूजन प्रसंगी सांगितले. ढाणकीला पुर्वी इतकी पाणी समस्या जानवणार नाही . तसेच ढाणकी व टेंभेश्वर नगर पुरवठा करणाऱ्या चार विहिरी या लाईनवर जोडल्या जाणार असून त्यामुळे 24 तास लाईन राहील व त्यामुळे ढाणकीचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. 

         यावेळी ढाणकी नगरपंचायत चे नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल ,सुदर्शन रावते , आनंदराव चंद्रे ,प्रकाश जयस्वाल, पुंजाराम हाराळे ,गणेश सुदेवाड ,नागेश रातोळे , बळवंत नाईक , विष्णुदास वर्मा ,दत्ता सुरोशे,श्रीकांत देशमुख, सरपंच बबनराव रावते ,मारोतराव रावते , शंकर काळकर , भारत तुपेकर आदी भाजपचे कार्यकर्ते,नगरपंचायत चे सर्व कर्मचारी व त्रकार बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad