मोखाडा तील सातुर्ली गावामधील २ घरांचे वादळाने छप्पर उडालाने प्रचंड नुकसान.
जव्हार प्रतिनिधी : सुनिल जाबर
सध्या सर्व महाराष्ट्रातभर वातावरण संतुलन बिघडले असून सगळी कडे अवकाळी पावसाने हजेरी लावली असून पालघर जिल्यातील मोखाडा तालुक्यातील एवघ्या ४ किलोमिटर वर असलेलं सातुर्ली गावामधील काल संध्याकाळी सुमारास ५ वाजताच्या दरम्यान या गावात प्रचंड वादळ आल्याने येथील श्री तुकाराम वामन पाटील यांच्या २ घरांचे पत्रे छप्पर वादळाने उडाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.
सदर या कुटुंबात त्यांचे आई,वडील आणि त्यांचे ३ मुले असे राहत असून त्यापैकी घरातील वयोवृद्ध महिला शकुंतलाबाई पाटील व वामन पाटील यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
सदर या घटनेची दखल घेत मोखाडा उपसभापती श्री प्रदीप वाघ यांनी मोखाडा तहसीलदार यांना माहिती दिली असून तातडीने तलाठी यांनी घराची पाहणी केली आहे तरी लवकरात लवकर यांची नुकसान भरपाई मिळावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे.