अजित पवार भाजपसोबत जाणार?
अजित पवारांची नाराजी दिसून येत असतानाच राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे एक ट्विट अंजली दमानिया यांनी केले आहे. मंत्रालयात कामानिमित्त गेले असता, तिथे एका व्यक्तीने त्यांना 15 आमदार बाद होणार असून अजित पवार भाजपसोबत जाणार अशी माहिती दिल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दूर्दशा होते हे बघू, असे म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.