Type Here to Get Search Results !

नांदेड जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या कडून लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाणपोईचे उद्घाटन

 


२० वर्षापासून मीलरोड भागातील नागरिकांसाठी व वाघी नाळेश्वर सर्कल मधील १६ गावाच्या प्रवाशांसाठी  उन्हाळ्यात पाणपोईचे आयोजन भाजपा नांदेड जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण  ॲड. दिलीप ठाकूर  यांच्या तर्फे करण्यात येत असून महावीर जयंती निमित्त २१ व्या वर्षीच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाणपोईचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रविण साले व प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिलीप कंदकुर्ते यांच्या हस्ते फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठया उत्साहात संपन्न झाले.




 फुलाने सजवलेल्या पाणपोइचे जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. लोकनेते कै. गोपीनाथ मुंडे , मातोश्री कै. वनमाला ठाकूर, कै. ॲड. श्याम जाधव, कै. बिरजू यादव, कै.लक्ष्मीबाई भुसेवाड यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी  पुष्पहार अर्पण केले. प्रविण साले यांनी मार्गदर्शन करतांना असे सांगितले की, तहानलेल्याला थंड पाणी मिळाल्यामुळे त्या व्यक्तीचा आत्मा संतुष्ट होऊन मनातून दुवा मिळतो.गरजूना अन्नदान, उन्हाळ्यात पाणपोई तसेच अनवाणी चालणाऱ्यासाठी चप्पल पुरविण्याची चरणसेवा, पावसाळ्यात छत्री वाटपाचा कृपाछत्र उपक्रम तसेच हिवाळ्यात थंडीत कुडकुडणाऱ्यांच्या अंगावर मध्यरात्री ब्लॅंकेट पांघरून देण्यात आलेली मायेची उब या सारखे तिन्ही ऋतूत चालणारे उपक्रम फक्त दिलीप ठाकूर हेच राबवू शकतात. दिलीप कंदकुर्ते यांनी आपल्या भाषणातून ॲड.ठाकूर हे वर्षभरात राबवित असलेल्या ७८ उपक्रमाबद्दल तोंड भरून कौतुक केले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळू खोमणे, संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, वैदकीय आघाडी जिल्हा संयोजक डॉ. सचिन उमरेकर यांची समयोचित भाषणे झाली.




कार्यकमाचे सूत्रसंचलन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख धीरज स्वामी यांनी तर  कामगार आघाडीचे सुरेश लोट  यांनी आभार मानले. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. चैतन्यबापू देशमुख, जिल्हा सरचिटणीस अशोक धनेगावकर व व्यंकट मोकले,जिल्हा चिटणीस केदार नांदेडकर व सिद्धार्थ धुतराज , शिवसेना महानगर प्रमुख तुळजेश यादव, प्रतापसिंह खालसा, अमोल कुलथिया,युवा मोर्चा सरचिटणीस सुनील पाटील, युवती प्रमुख महादेवी मठपती, कांचन गहलोत, लक्ष्मी वाघमारे, दिलीपसिंह सोडी, वैशाली देशमुख, राजेंद्रसिंघ पुजारी, बबलू यादव, बजरंगसिंग ठाकूर, हरभजन पुजारी, प्राचार्य बालाजी गिरगावकर, अभिषेक सौदे, शितल खांडील, आनंद बामलवा, अक्षय अमीलकंठवार, बिरबल यादव यांच्या सह मोठया प्रमाणात भाजप पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर, प्रभुदास वाडेकर, संतोष भारती, कपिल यादव, कैलास बरंडवाल, राजू बनसोडे यांनी परिश्रम घेतले. नगरसेवक असताना दिलीप ठाकूर यांनी सुरू केलेला पाणपोईचा उपक्रम पद गेल्यानंतरही  सातत्याने चालू ठेवल्याबद्दल मिलरोड भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad