पंढरपूर 13 जागेसाठी 29 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेली पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध न होता केवळ 5 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर 13 जागेसाठी 29 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. यात काळे-भालके गट व आ. समाधान आवताडे समर्थकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर अभिजीत पाटील गटाने 12 जागेसाठी तर 2 जागेसाठी मनसे व 2 जागेसाठी अपक्षांनी उमेदवारी अर्ज ठेवले आहेत.