मोखाड्यात रमजान ईद उत्साहात नमाज पठण करून संपूर्ण मानवजातीसाठी मागीतली दुवा
मोखाडा : सौरभ कामडी
जगरभर रमजान ईद साजरी होत असतानाच मोखाडा तालुक्यातही रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली.यावेळी मोखाड्यातील मुस्लीम बांधवांनी सर्व देशवासीयांसाठी दुवा मागून नमाज पठण केली .यावेळी अंतर्गत राग रुसवा विसरुन एकमेकांना अलिंगन देवून ईदच्या शुभेच्छा दिल्या याव्यतिरिक्त प्रत्येकणाने एक एकमेकांच्या घरी जावूनही सदिच्छा दिल्या.यावेळी मोखाडा पोलिस निरीक्षक ब्राह्मणे यांनी ईदगाह जवळ येवून गुलाबपुष्प देवून प्रत्येक बांधवाचे स्वागत केले तर आमदार सुनिल भुसारा यांनीही घरोघरी जावून मुस्लीम बांधवांची भेट घेतली.
रमजान मध्ये महिनाभर उपवास करून आज ईद साजरी करताना सर्व बांधव अतिशय उत्साहित दिसत होते.ईदगाह मध्ये नमाज पठणानंतर समाजातील द्वेष मत्सर जातीयवाद नष्ट व्हावा अशी प्रार्थना करुन आपल्या घरातील निधन झालेल्या जेष्ठ श्रेष्ठांच्या प्रती सदभावना व्यक्त केली.यावेळी नगराध्यक्ष अमोल पाटील,नगरसेवक प्रमोद कोठेकर,नगरसेवक अमजद अंसारी,कॉंग्रेसचे अध्यक्ष जमशीद शेख,अनिल दोंदे, वैभव पाटील आदि उपस्थित होते.