Type Here to Get Search Results !

प्रकाश निकम जिल्हा परिषद अध्यक्ष पालघर यांच्या हस्ते ISO मोखाड्यात प्रमाणपत्र वितरण



प्रकाश निकम जिल्हा परिषद अध्यक्ष पालघर यांच्या हस्ते ISO मोखाड्यात प्रमाणपत्र वितरण 


मोखाडा :-सौरभ कामडी 

      पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळा पाचघर तसेच जिल्हा परिषद शाळा सावर्डे शनिवार दिनांक 18 मार्च 2023 रोजी जिल्हा परिषद शाळा पाचघर ,जिल्हा परिषद शाळा सावर्डे या दोन्ही पालघर जिल्ह्याचे शेवटचे टोक आसलेल्या मोखाडा तालुक्यातील किनिस्ते केंद्रातील अतिदुर्गम शाळा .




पण शिक्षक आणि ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आज या दोन्ही शाळांना गुणवत्ता व व्यवस्थापन ISO 9001-2015 चे मांनांकन प्राप्त झाले.पाचघर ग्रामस्थानी आयोजित एका भव्य दिव्य कार्यकमात आज या दोन्ही शाळांना ISO प्रमाणपत्राचे वाटप पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष .प्रकाश निकम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.




कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती कुसुमताई झोले , मोखाडा तालुका पंचायत समिती उपसभापती तसेच शिवसेना विधानसभा विक्रमगड संघटक प्रदीप वाघ पंचायत समिती सदस्या श्रीमती आशाताई झूगरे, करोल पाचघर ग्रामपंचायत सरपंच, नरेंद्र येले, काष्टी सावर्डे ग्रामपंचायत सरपंच बोटे,व माजी सरपंचहनुमंतपादिर,तालुक्याचे गटविकास अधिकारी मा. कुलदीप जाधव साहेब , गट शिक्षणाधिकारी अमोल जंगले , सामाजिक कार्यकर्ते, मिलिंद झोले तसेच किनिस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख व शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .




शाळेला मदत करणारे जाणीव सामाजिक संस्थेचे मनोज पांचाळ व ए.एस.के फाऊंडेशन चे सदस्य उपस्थित होते . प्रदिप वाघ यांनी शाळा विकासा साठी ग्रामस्थांचे महत्व पटवून दिले तर अध्यक्षीय भाषणात प्रकाश निकम यांनी आदिवासी समाजातील अंधश्रद्धा आडानिपणा दुर करून शिक्षणाचे महत्व पटवून देत असताना जास्तीत जास्त तरुणांनी तसेच मुलींनी शिक्षणाकडे लक्ष दिला पाहिजे, कमी वयामध्ये लग्न न करता पहिल्यांदा आपण आपले शिक्षण पूर्ण केले पाहिजे. हे आपल्या आदिवासी भाषण शैलीतून उपस्थित ग्रामस्थांना पटवूनदिले ,जिल्हापरिषद शाळांचा दर्जा सुधारणेसाठी किनिस्ते केंद्रातील शाळा कोचाळे , पाचघर , सावर्डे या ISO शाळांचा आदर्श तालुका आणि जिल्ह्यातील इत्तर शाळांनी घ्यावा असे प्रतिपादन मा. अध्यक्ष यांनी केले. मोठ्या संख्येने ग्रामस्थ कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News